
वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न
वाशिम, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली आज वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे आदी विभागप्रमुख उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी वार्षिक कृती आराखड्याचा तपशीलवार मसुदा पाहिला. महास्ट्राईडचे मोहम्मद आमीन यांनी अधोरेखित केलेल्या मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील २ ते ३ दिवसांत संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवून विसंगती असल्यास दूर करण्याचे निर्देश दिले.
वार्षिक कृती आराखड्याबरोबरच बैठकीत “MITRA आणि MAITRI च्या माध्यमातून जिल्हास्तरीय समन्वय” या विषयावरही चर्चा झाली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या महत्वाच्या सूचना अहवालात समाविष्ट करण्याचे तसेच पीपीटीव्दारे आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान वार्षिक कृती आराखडा या संदर्भात विभागीय आयुक्त स्तरावर सविस्तर चर्चा झाल्याचे नमूद करण्यात आले. या कृती आराखड्यात नमूद करण्यात आलेल्या २० विभागांपैकी अनेक विभागांच्या उद्दीष्टे /अनुदान आवश्यकता आणि स्त्रोत यामध्ये बारकाईने तपासणी करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की,
> “प्रत्येक विभागप्रमुखांनी स्वतः संबंधित नोंदी तपासून आवश्यक दुरुस्ती करावी. एकदा हा कृती आराखडा पालकमंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी सादर झाल्यानंतर, विभागनिहाय उद्दिष्टपूर्तीच्या आधारे नियमित आढावा घेतला जाणार आहे, हे सर्व विभागांनी लक्षात ठेवावे.
बैठकीत जिल्हास्तरावर विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना आणि समन्वय वाढविण्याबाबतही चर्चा झाली.
0 Response to "वार्षिक कृती आराखडा २०२५-२६ सादरीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक संपन्न "
Post a Comment