स्थानिक: ग्राम गोभणी येथील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयीन अतिक्रमण नियमानुसार करणे बाबत निवेदन सादर.........
साप्ताहिक सागर आदित्य
स्थानिक: ग्राम गोभणी येथील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयीन अतिक्रमण नियमानुसार करणे बाबत निवेदन सादर.........
मौजे गोभणी तालुका रिसोड येथील अनुसूचित जाती व जमाती, भटके विमुक्त अल्पसंख्यांक व इतर असे बरेच निवासी कुटुंब मागील 40 वर्षापासून प्रयोजनासाठी अतिक्रमण करून राहत आहेत. व ग्रामपंचायतचा भोगवटदार म्हणून घर टॅक्स नळ, टॅक्स भरत आहेत .परंतु त्यांना प्रधानमंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना ,शबरी आवास योजना अशा कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. परंतु आता राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार जे कुटुंब 1 जानेवारी 2011 पूर्वीचा निवासी आहे त्याकडे पुरावे म्हणून घर टॅक्स पावती जागेचा 8 अ, दारिद्र्य कार्ड, रेशन कार्ड ,विजेचे बिल आदी पुरावे आहेत .अशा सर्व कुटुंबांची यादी तयार करून गावातील ग्रामपंचायत सचिव व तलाठी यांना माननीय तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याकरिता सांगितले आहेत .त्यामधील काही कुटुंबांनी स्वतः एकूण 62 लोकांची पुराव्यानिशी यादी तयार करून गावातील ग्रामविकास अधिकारी खरबळ साहेब व तलाठी ससाने साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी गावातील सरपंच सौ. विद्या सरोदे व उपसरपंच अशोकराव देशमुख सर, शेख नय्युम शेख शब्बीर, गणेश श्रीराम सोळंके, गजानन मिल्ट्री पवार, शेख वहाप शेख रहीम, शेख मोहीम शेख बाबू, विजय राऊत, अजय पवार ,विजय पवार, सदानंद हुले, रामभाऊ काळदाते ,सतीश काकडे, रामचंद्र धारकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Response to "स्थानिक: ग्राम गोभणी येथील ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयीन अतिक्रमण नियमानुसार करणे बाबत निवेदन सादर........."
Post a Comment