-->

शेतकरी बांधवांनो...ऐका ना..!  वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' स्थापन झाला बरं का..!

शेतकरी बांधवांनो...ऐका ना..! वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' स्थापन झाला बरं का..!



साप्ताहिक सागर आदित्य 

शेतकरी बांधवांनो...ऐका ना..!

वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' स्थापन झाला बरं का..!  


वाशिम,

जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. सोयाबीन, तूर, चिया, गहू, कापूस, ज्वारी, हळद आणि विविध फळे व भाजीपाला ही येथील प्रमुख पिके आहेत. विखुरलेल्या बाजारपेठा, संघटित व्यासपीठांचा अभाव, किमतींमधील चढ-उतार, मर्यादित माहिती आणि अपुऱ्या काढणीपश्चात पायाभूत सुविधांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवण्यात अनेक अडचणी येतात. वाशिमची अर्थव्यवस्था संपुर्णतः कृषी व्यवसायावर अवलंबून असूनही, शेतकरी गुंतागुंतीच्या बाजारपेठेतून मार्ग काढण्यात आणि योग्य भाव मिळवण्यात असमर्थ ठरतात.


या समस्यांवर मात करण्यासाठी, कृषी उत्पादनांच्या विपणनाची प्रक्रिया सुलभ करणे, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे, बाजारपेठेत प्रवेश वाढवणे आणि मूल्यवर्धित सेवांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने 'वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' स्थापन करण्यात आला आहे.


प्रकल्पाची गरज :

• किंमतीतील अस्थिरता आणि शोषण : शेतकऱ्यांना किमतीमधील मोठ्या बदलांचा आणि मध्यस्थांकडून होणाऱ्या शोषणाचा अनुभव येतो.

• माहितीची विषमता : वेळेवर आणि अचूक बाजारपेठेतील माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास अडचणी येतात.

• काढणीपश्चात नुकसान : अपुरी साठवण क्षमता आणि हाताळणीच्या योग्य पद्धती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

• बाजारपेठेत मर्यादित प्रवेश : लहान शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळत नाही.

• संघटित विपणनाचा अभाव : एक सुव्यवस्थित प्रणाली नसल्यामुळे मूल्य साखळ्यांवर परिणाम होतो.

• मूल्यवर्धनाची गरज : स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करण्याची मोठी क्षमता असूनही त्याचा पुरेपूर वापर केला जात नाही.


प्रकल्पाची उद्दिष्ट्ये :

• बाजारपेठ माहिती केंद्र स्थापन करणे.

• शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात थेट संपर्क सुलभ करणे.

• देशांतर्गत व देशाबाहेरील विपणन पद्धतींना प्रोत्साहन देणे.

• काढणीपश्चात नुकसान कमी करणे.

• शेतकरी उत्पादक संघटनांना (FPOs) प्रोत्साहन देणे.

• स्थानिक मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.


कार्यपद्धती :

1. सुरुवातीला, शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) त्यांच्या उत्पादनाच्या प्रमाणात आणि गुणवत्तेची माहिती देऊन विपणन कक्षाकडे नोंदणी करावी लागेल.


2. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विपणन कक्ष राज्य आणि देशभरातील खरेदीदारांशी समन्वय साधेल. विपणन कक्ष त्यांच्यात उत्प्रेरक आणि समन्वयक म्हणून काम करेल आणि योग्य व्यापार करण्यास मदत करेल.


3. कृषी विपणन कक्षाच्या योग्य देखरेखेखाली व्यापार केला जाईल.


संपर्क :

ईमेल: Washimshetishilp@gmail.com

फोन: 8237410073

असे आरीफ शाह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

0 Response to "शेतकरी बांधवांनो...ऐका ना..! वाशिममध्ये 'शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष' स्थापन झाला बरं का..! "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article