-->

युवा महोत्सव' युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस   जिल्हास्तरीय युवा महोत्सव थाटात संपन्न

युवा महोत्सव' युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय युवा महोत्सव थाटात संपन्न


 

साप्ताहिक सागर आदित्य 

'युवा महोत्सव' युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ

          जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस 

जिल्हास्तरीय युवा महोत्सव थाटात संपन्न


वाशिम,  : जिल्हास्तरीय युवा महोत्सव हे युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम व जिल्हा युवा अधिकारी / नेहरु युवा केंद्र, वाशिम तथा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने  तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.४ ते ५ डिसेंबर रोजी वाटाणे लॉन येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.  प्रमुख पाहुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आकाश आहाळे व प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव डाबेराव आणि नेहरु युवा केंद्र समन्वयक अनिल ढेंगे आदी उपस्थित होते.


श्रीमती बुवनेश्वरी युवा महोत्सवाविषयी बोलतांना म्हणाल्या, या महोत्सवात चित्रकला, कथालेखन, कवितालेखन, मोबाईल फोटोग्राफी, विविध कलाप्रकार जसे की लोकगीत, लोकनृत्य, वक्तृत्व, कथालेखन आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांच्या माध्यमातून हा युवा महोत्सव युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी महोत्सवात सहभागी सर्वांना शुभेच्छा संदेश दिला.  प्रास्ताविकातून जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी युवा महोत्सवाची माहिती दिली.

या युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक स्पर्धाः समुह लोकनृत्य, प्रकारात आर.ए. कॉलेज वाशिम यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम व तृतीय क्रमांक मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, वाशिम यांनी पटकविला. समुह लोकगीत या प्रकारामध्ये आर.ए. कॉलेज वाशिम यांनी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम व तृतीय क्रमांक नेहरू युवा बहुउद्देशीय संस्था, केकतउमरा यांनी पटकविला. वत्कृत्व स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमाक ऋतुजा भारत योगोवाड द्वितीय क्रमांक मुस्कान भवानीवाले, तर तृतीय क्रमांक योगीता कुऱ्हाडे यांनी मिळविला तर चित्रकला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी धम्मानंद वानखेडे, द्वितीय क्रमांक भूमिका निरंजन ठक्कर त तृतीय क्रमांक कु. भुमिका पांडुरंग ढोकणे कथालेखन या स्पर्धेमध्ये ऋतुजा भारत योगोवाड द्वितीय क्रमांक स्वराली नितीन वाणी व राधिका दिपक दंडे तर तृतीय क्रमांक प्रतिक्षा विनोद वानखेडे यांनी मिळविला. कविता लेखन या स्पर्धेमध्ये ऋतुजा भारत योगोवाड प्रथम, विजयआधारीत स्पर्धामध्ये विज्ञान प्रदर्शनी यामध्ये एस.एम.सी इंग्लिश स्कूल वाशिम प्रथम व ने सी. हायस्कुल कारंजा लाड प्रथम (एकल) यांनी पारितोषीक प्राप्त केले.

     या महोत्सवातील स्पर्धेसाठी प्रा.डॉ. अनिल रा. सोनुने, प्रा. किरण सोनूने, प्रा. डॉ. दीपक दामोदर, प्रा. सी. किरण  राऊत , प्रा. डॉ. शशी पवार, प्रा. अशोक वाघ, प्रा. सुनिता अवचार  संजय  दळवी, अमोल  काळे, सोनाली  दळवी ,प्रा. सुनिता  अवचार, शेषराव पिराजी धांडे, मोहन यशवंत शिरसाट , शेषराव  धांडे, प्रा. प्रगती उके, प्रा. प्रिया बागडे (मोरे), प्रा. सुरेंद्र वानखेडे इत्यादींनी विविध स्पर्धांच्या पंचांची मोलाची भुमिका बजावली. 

  विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोग यशस्वीतेकरीता प्रा. विजय भड मुख्याध्यापक पक बाबासाहेब धाबेकर विद्यालय, यावर्डी ता. कारंजा यांनी प्रयत्न केले. महिलावर होणारे अत्याचार यावर गीत सादर करून बाकलीवाल विद्यालयाचे एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी अमोल रामभाऊ काळे यांच्या सहकार्याने सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.  

     कार्यक्रम यशस्वीतेकरीताक्रीडा अधिकारी मारोती सोनाकांबळे, , संतोषकुमार फुपाटे , वरिष्ठ लिपीक विजय बोदडे , क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेभुर्णीकर , प्रकाश मोरे, विकास तिडके, भारत वैद्य, कलिम मिर्झा, सुशांत कलढोणे, भागवत मापारी आदींनी पुढाकार घेतला.कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन वाघ यांनी केले. आभार जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी मानले.

0 Response to "युवा महोत्सव' युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देणारं व्यासपीठ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस जिल्हास्तरीय युवा महोत्सव थाटात संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article