-->

अडोळी येथे स्वतंत्र महीला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न     उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हे

अडोळी येथे स्वतंत्र महीला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हे


 

साप्ताहिक सागर आदित्य 

अडोळी येथे स्वतंत्र महीला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न

   उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हे 

जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती वाशिम अंतर्गत राबविले जात आहे.या अभियानामुळे महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे छोटे मोठे उद्योग व्हावे व ते आर्थिक सक्षम व्हावे याकरिता अभियान विविध उपक्रम राबवत आहे.त्याचप्रमाणे वाशिम तालुक्यातील आडोळी या गावांमध्ये स्वतंत्र महिला प्रभाग संघाची सभा घेण्यात आली. आडोळी या प्रभागामध्ये एकूण 14 गाव असून जवळपास 293 समुह असून 2800 कुटुंब जोडण्यात आले. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये महिलांचा ग्राम संघ स्थापन करण्यात आले आहे. असे ऐकून 16 ग्राम संघ स्थापन करण्यात आले आहे.त्या प्रत्येक ग्राम संघातील सर्व पदाधिकारी व त्या गावांमधील सर्व समूहाचे अध्यक्ष सचिव व व प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव या सभेला उपस्थित होते.

सभेमध्ये खालील विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली 

सर्वप्रथम प्रभाग संघांची रूपरेषा कशी असावी व त्याचे महत्त्व याविषयी प्रस्तावित करण्यात आले नंतर प्रभाग संघाचा अर्थिक लेखा जोखा अहवाल वाचन करण्यात आला.

 2023 -24 मधील आज पर्यंत प्रभाग संघाने कोणते ठराव मंजुर केले व कोणत्या योजनेचा लाभ घेतला यावर सविस्तर माहिती दिली.आज पर्यंत प्रभाग संघाला कोन कोणते निधी प्राप्त झाले व कोणत्या ग्राम संघाला कीती निधी वाटप केले याचे वाचन करण्यात आले. प्रभाग संघाने प्रत्येक ग्राम संघाला किती निधी वाटप केला व किती परतफेड केली याचे लिपिका द्वारे वाचन करून घेण्यात आले.

तसेच प्रतेक गावांमध्ये अभियानांतर्गत किती उपजीविका तयार झाल्या त्याचे सुद्धा वाचन करण्यात आले. व या 2024-25 आर्थिक वर्षांमध्ये समूहातील प्रत्येक महिला लखपती दीदी व्हावी याकरिता या सभेमध्ये नियोजन करण्यात आले. 2024-25 मध्ये प्रभाग संघाने कोणतती कामे करायची आहेत त्याची रुपरेषा तयार करून त्याप्रमाणे ठराव तयार करण्यात आले. उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनेची माहिती दिली.लखपती दिदी व उपजीविका याविषयी माहिती संगण्यात आली. तसेच ज्या महिलांचे उमेद मुळे अर्थिक जीवनमान उंचावून भरारी घेतली अश्या महिलांनी आपली स्वतःची यशोगाथा सादर केली.

तसेच समूहातील प्रत्येक महिलांना बँक कर्ज व वैयक्तिक कर्ज मिळावे जेणेकरून त्यांच्या उपजिविकेला हातभार लागून त्यांचे उद्योग मोठे होतील याविषयी प्रभाग संघाने ठराव घेऊन पारित केले. तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत अडोळी या गावामध्ये धनपावली महीला शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली या कंपनी विषयी महिलांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले व लवकरच या कंपनीची उभारणी करण्यास सुरुवात होईल यामुळे महिलांना स्वयम् रोजगार मिळेल व त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल.या सदर वार्षिक सभेला

उपस्थितीत प्रभाग संघाचे अध्यक्ष सौ उषाताई नारायण वानखेडे , सौ रूपाली रमेश डाखोरे (सचिव ), सौ वैष्णवी कृष्णा कोल्हे (कोषाध्यक्ष), प्राभग संघ लिपिका सौ संगीता राजकुमार पडघान, चव्हाण सर (जिल्हा व्यवस्थापक IBCB) ,  शेनगावकर सर(BMM),

 खोलगडे सर (तालुका व्यवस्थापक IBCB) ,  रामटेके (तालुका व्यवस्थापक FI) , प्रभाग समन्वयक विजय उगले यांनी सभेमध्ये सखोल चर्चा करून मार्गदर्शन केले.

0 Response to "अडोळी येथे स्वतंत्र महीला प्रभाग संघाची वार्षिक सभा संपन्न उमेद -महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान हे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article