-->

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माता पालक संघाची कार्यकारणी गठीत

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माता पालक संघाची कार्यकारणी गठीत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माता पालक संघाची कार्यकारणी गठीत  :रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींचे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे माता-पालक शिक्षक संघाची सभा दिनांक 30 ऑगस्ट रोजी  गठीत करण्यात  आली. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षा मा. प्राचार्या सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम ह्या होत्या. व प्रमुख अतिथी पर्यवेक्षक विलासराव देशमुख सर हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्या, पर्यवेक्षक व माता पालकांचे स्वागत करण्यात आले. प्रथमतः माता पालक संघाच्या पदसिद्ध अध्यक्षा प्राचार्या सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . व याला अनुमोदन प्राध्यापिका दीपिका पुंड मॅडम यांनी दिले. माता-पालकांमधून अध्यक्षा  सौ.जाकोटीया मॅडम यांची निवड करण्यात आली व याला अनुमोदन ज्येष्ठ शिक्षका शेटे मॅडम यांनी दिल. तसेच शिक्षकांमधून मधून उपाध्यक्ष म्हणून प्रा. शाम चौमवाल  सर यांचे नाव ज्येष्ठ शिक्षक सुनील डहाळके सर यांनी सुचवले, व त्याला अनुमोदन विजय हारकर सर यांनी दिले. पालकांमधून उपाध्यक्षा सौ.अनिताताई सोळंके, शिक्षकांमधून सचिव आर.बी.देशमुख सर, यांचे नाव आनंद झडपे सर यांनी सुचवले व त्याला अनुमोदन बोराळकर  सर  यांनी दिले. पालकांमधून सचिव सौ. खराटे मॅडम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. अशाप्रकारे माता पालक शिक्षक संघ स्थापन करण्यात आला.  त्यानंतर.आर.बी. देशमुख सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांच्या बरोबरच पालकांची ही जबाबदारी तेवढीच आहे असे सूचक विधान केले,प्रा.श्याम चौमवाल सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींच्या  प्रगती विषयी माता पालकांनी वेळोवेळी शिक्षकांशी सुसंवाद साधायला हवा असा सूचक सल्ला दिला. सौ.जाकोटिया मॅडम आपल्या मनोगता तून मुलींसाठी एकमेव सुरक्षित शाळा म्हणून कन्या शाळा ही होय असे सूचक विधान केले, तसेच सौ. अनिताताई सोळंके यांनी  आपल्या मनोगतुन विद्यार्थिनी शिक्षणाबरोबर एक व्यावसायिक शिक्षणाची व स्पर्धा परीक्षा ची संधी कन्या शाळेने उपलब्ध करून दिली त्याबद्दल कन्या शाळे  विषयी ऋण व्यक्त केले,सौ. खराटे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की  कन्या शाळा म्हणजे सुसंस्काराचे माहेरघर आहे आणि येथून प्रत्येक शिक्षण घेऊन जाणारी विद्यार्थिनी चांगले संस्कार घेऊन जाते. प्रत्येक विद्यार्थिनींच्या आयुष्याची जडणघडण याच ज्ञान मंदिरात होते.  शिक्षणाबरोबर विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास या शाळेत होतो असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून या माता पालकांनी व्यक्त केले. व शेवटी  अध्यक्षीय मनोगतातून या कार्यक्रमाच्या पदसिद्ध अध्यक्षा  प्राचार्या सौ. मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी माता पालक संघातील माता पालकांना  संबोधित करताना  माता पालक शिक्षक आणि विद्यार्थिनी यांच्यामध्ये कसा समन्वय असायला हवा या समन्वयातून विद्यार्थिनींचि प्रगती  जास्तीत जास्त कशी करता येईल . पालकांचे शाळेचे व शिक्षकाचे नावलौकिक कशा पद्धतीने वाढेल . त्याचबरोबर पालकांनी सुद्धा शाळेच्या शिक्षकांशी वेळोवेळी संवाद साधायला हवा यातून  विद्यार्थिनींच्या चांगल्या जडणघडणीमध्ये शाळेतील शिक्षका बरोबर पालकाचा मोलाचा हातभार असायला हवा  आपल्या पल्ल्याच्या प्रगतीची वेळोवेळी शहानिशा व्हायला हवी असे सूचक विधान आपल्या मनोगतातून  व्यक्त केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता देशमुख मॅडम व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ.विजया कौटकर मॅडम  यांनी केले. या कार्यक्रमाला माता-पालक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Response to "भा.मा. कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माता पालक संघाची कार्यकारणी गठीत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article