-->

जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम  राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम

जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम


नेत्रदान पंधरवाड्या दरम्यान श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महा. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा मरनोत्तर नेत्रदानाचा संकल्प


दिनांक २५ ऑगष्ट ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात ३९ वा नेत्रदान पंधरवाडा साजरा होत असुन २५ ऑगष्ट पासुन प्रारंभ झालेल्या या पंधरवाडयानिमीत्त नेत्रदाना बाबत जनजागृतीच्या हेतुने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हयातील सर्व ग्रामिण रुग्णालयामध्ये नेत्ररुग्णांची प्रथम तपासणी करुन त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे जिल्हा स्तरावर नेत्रशल्य चिकित्सकाकडुन योग्य तो औषधोपचार व मार्गदर्शन करण्यात आले. व  त्यानिमीत्त दिनांक ०६/०९/२०२४ वार शुक्रवार रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अविनाश पूरी डॉ. आशिष बेदरकर याच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्याल्य येथील बि.एस.डब्लु. भाग १ च्या विद्यार्थ्यांना नेत्रदान पंधरवाडयानिमित्त नेत्रदाना बाबत व डोळयांच्या विविध आजारावर चर्चासत्र घेउन कोणत्या कारणाने डोळयांचे आजार होतात व ते न होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहीजे त्याबद्दल सखोल मार्गदर्शन रवि घुगे नेत्रचिकित्सा अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम यांनी केले.


त्याच प्रमाणे नेत्रदान हे एक श्रेष्ठदान आहे. नेत्रदान केल्याने अंध व्यक्त्तीच्या जिवनात प्रकाश निर्माण करु शकते. त्यामुळे नेत्रदान करावे व इतरांनासुध्दा नेत्रदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ३९ व्या नेत्रदान पंधरवाड्यानिमीत्त सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदानाचा संकल्प करुण नेत्रदान संम्मतीपत्र हि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रदान समूपदेशक श्री. रमेश जि. ठकारे यांच्याकडे भरुन दिले. तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी आम्ही नेत्रदान करण्यासाठी इतरांना सुध्दा प्रवृत्त करु अशी प्रतिज्ञा केली.


सदर कार्यक्रमास बहुसंख्येने विद्यार्थीनी व कर्मचारी वृदं हजर होते.

0 Response to "जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम राष्ट्रीय अंधत्व नियंत्रन कार्यक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article