स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ. सीईओ वैभव वाघमारे यांनी केले श्रमदान.
साप्ताहिक सागर आदित्य
स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ.
सीईओ वैभव वाघमारे यांनी केले श्रमदान.
स्वच्छता ही सेवा 2024 या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तथा पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, महिला व बालकल्याण अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या स्टँडीचे फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषद इमारतीच्या बाहेर श्रमदान करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी हातात खराटा घेऊन परिसर स्वच्छ केला. विभागाचे प्रकल्प संचालक जगदीश साहू आणि इतर विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बाहेरील परिसर स्वच्छ करण्यात आला. अशाच पद्धतीचे उपक्रम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतीमध्ये करण्यात येत आहेत. दोन ऑक्टोबर पर्यंत गावामध्ये विविध उपक्रम राबवून हा स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी दिली.
0 Response to "स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ. सीईओ वैभव वाघमारे यांनी केले श्रमदान."
Post a Comment