पाणी व स्वच्छतेच्या कामात लोकांचा सहभाग हवा: जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे
साप्ताहिक सागर आदित्य
पाणी व स्वच्छतेच्या कामात लोकांचा सहभाग हवा: जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे
गावामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेसाठी विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा उभारल्या जात आहेत आणि पाणी पुरवठ्याची विविध कामे केली जात आहेत. पाणी व स्वच्छता विषयक कामे दीर्घकाळ टिकण्यासाठी लोकांचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
ठाकरे यांनी ( दि. 9) जि प च्या म फुले सभागृहात बैठक घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध कामांबाबत आढावा घेतला त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.
ते म्हणाले, गावात सर्व प्रकारच्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करून गावे मॉडेल करण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू आहे. वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापनासाठी नाली बांधकाम आणि कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेग्रीगेशन शेड तयार करणे, घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी कचराकुंड्याची व्यवस्था करणे, गावात कुणीही उघड्यावर जाऊ नये यासाठी सार्वजनिक शौचालय, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी शेड, कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था इत्यादि सुविधा गावात करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना उभारण्यात येत आहे. या सर्व योजनांमध्ये लोकांचा सहभाग घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष ठाकरे यांनी केले.
यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, जिल्हास्तरीय सल्लागार आणि बी आर सी- सी आर सी यांची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी पुढील काळामध्ये गावातील शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण असे विशेष अभियान राबविण्याचे संकेत दिले.
--------------------
0 Response to "पाणी व स्वच्छतेच्या कामात लोकांचा सहभाग हवा: जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे "
Post a Comment