-->

लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या छाननीत 97 टक्के काम करुन वाशिम जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक

लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या छाननीत 97 टक्के काम करुन वाशिम जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक

 


साप्ताहिक सागर आदित्य 

लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या छाननीत  वाशिम राज्यात तिसरा.

राज्याच्या मुख्य सचिवांनी केले कौतुक.

वाशिम दि 8

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या छाननीत 97 टक्के काम करुन वाशिम जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ऑनलाईन बैठकीत वाशिम जिल्ह्याचे कौतुक केले आहे. 

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच कुंटूबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यंमत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत  21 ते 65 वयोगटातील विवाहीत,विधवा,घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांना शासनाकडून दर महा रु. 1500 एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

राज्यामध्ये मुख्यंमत्री माझी बहिण योजनेचे ऑनलाईन अर्जाची छाननी करण्यामध्ये वाशिम जिल्हाचा तिसरा क्रमांक असून वाशिम जिल्ह्याचे  97 टक्के काम आहे. वाशिम हा आकांक्षीत जिल्हा असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या वतीने पुरेपूर प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये राज्यस्तरावर वाशिम जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आला असून कोल्हापूर जिल्ह्याचा पहिला  आणि नंदुरबार जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी वैयक्तिक लक्ष घालून सतत पाठपुरावा केला.

--------------------------------- 

"जिल्हाधिकारी मा. बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि  जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राम स्तरावरील ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ऑपरेटर यांच्या अविरत प्रयत्नामुळे या कामाला गती आली आहे."

-संजय जोल्हे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग

----------------------------------

0 Response to "लाडकी बहिण योजनेच्या ऑनलाईन अर्जाच्या छाननीत 97 टक्के काम करुन वाशिम जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article