-->

१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार

१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार

 


साप्ताहिक सागर आदित्य 

१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार


राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमांतर्गत लवकरच हाेणार शस्त्रक्रिया


वाशिम, जिल्हा सामान्य रूग्णालयात हृदयाचा त्रास हाेत असलेल्या १७० बालकांचे टू डी इकाे करण्यात आले. यामध्ये ३७ बालकांमध्ये हृदयाला छिद्र म्हणजेच हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले असुन, लवकरच या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमांतर्गत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी दिली. सन २०२४ मध्ये पहिल्यांदाच इतक्या माेठ्या प्रमाणात बालकांची तपासणी करण्यात आली.

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण माेठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे याचे वेळीच याेग्य निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य आहे. लहान मुलांनाही जन्मतःच हृदयविकार हाेतात. यामध्ये त्यांच्या हृदयाला छिद्र असणे, श्वास घेण्यास त्रास हाेणे, धाप लागणे यासारखी लक्षणे आढळुन येतात. त्यामुळे अशा बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्षे वयाेगटातील मुलांचे वेळीच निदान करून माे\ त उपचार केले जातात. त्यामुळे हृदयविकार आजाराचे निदान करण्यासाठी टू डी इकाे हे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय वाशिम येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या टू डी इकाे मशीनवर रविवार १४ जुलै राेजी हृदयाचा त्रास जाणवत असलेल्या १७० बालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३७ बालकांमध्ये हृदयविकार असल्याचे निदान करण्यात आले आहे. त्यामुळे या बालकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्यावर लवकरच माे\ त हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी रूग्णांची तपासणी मुंबई येथील बालाजी हाॅस्पिटलमधील हृदयराेग तज्ञ डाॅ. भुषण चव्हाण, व्यवस्थापक प्रतिक मिश्रा आणी त्यांच्या चमुने केली. या शिबीराला जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी भेट देऊन या उपक्रमाचे विशेष काैतुक केले. राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांचे मार्गदर्शनात , अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अविनाश पुरी, बालराेग तज्ञ डाॅ. प्रशांत चव्हाण, आरबीएसके चे पर्यवेक्षक आकाश ढाेके, कार्यक्रम सहाय्यक तुषार ढाेबळे, डाॅ. वैशाली महाकाळ, डाॅ. अर्चना बाेरकर, डाॅ. राजश्री कांबळे, डाॅ. वैशाली भालेराव, डाॅ. रश्मी नागपुरकर, डाॅ. सनी शर्मा, डाॅ. सतिश पाटील, डाॅ. रविकुमार बाेरा यांनी विशेष परिश्रम घेतले. विश्वकर्मा खाेलगडे, प्रदीप भाेयर, जगदीश अढाव, विठ्ठल कढणे, अमाेल खानझाेडे, महादेव बेंडवाले, ज्याेती तायडे, दिशा राठाेड, स्वाती शिंदे, दिपाली उबाळे, सविता धनकर, अश्विनी हिवराळे, मनाेज श्रृंगारे, सतिश कव्हर यांचेसह आरबीएस कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर शिबीर यशस्वी करण्यात माेलाचे सहकार्य केले.


बाॅक्स : 

सहा महिण्यात ४१ बालकांवर शस्त्रक्रिया

राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रमाअंतर्गत सन २०२४ मध्ये जानेवारी ते जून या सहा महिन्यात ० ते १८ वयाेगटातील बालकांवर हृदयविकाराच्या पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हर्णीयाच्या पाच शस्त्रक्रिया, तिरळेपणाच्या पाच शस्त्रक्रिया, दुभंगलेल्या ओठांच्या तीन आणी इतर २३ शस्त्रक्रिया. अशा प्रकारे एकूण ४१ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे यांनी दिली.


या बालकांचा शाेध कसा लागताे ?

राष्ट्रीय आराेग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम राबविला जाताे. या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयाेगटातील मुलांची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी पासुन ते माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये ही तपासणी माेहिम राबविल्या जाते. जिल्ह्यात शासकीय, अनुदानित, विना अनुदानीत अशा एकुण १ हजार १५१ शाळांमधील २ लाख विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते. तर १ हजार १९२ अंगणवाडी मधील एक लाख बालकांची वर्षातुन दाेन वेळा तपासणी करण्यात येते. या तपासणी माेहिमेतून गंभीर आजार असलेल्या बालकांचा शाेध लागताे.


तपासणी पथकामध्ये असताे यांचा समावेश

वाशिम जिल्ह्यात एकुण १६ तपासणी पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकामध्ये एक पुरूष वैद्यकीय अधिकारी, एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी, एक आराेग्य सेविका यांचा समावेश असताे.


राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम कसा राबवतात ?

जिल्ह्यातील अंगणवाडी आणी शाळेमधील ० ते १८ वयाेगटातील बालकांची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान ज्या मुलांना किरकाेळ उपचाराची आवश्यकता असते अशा मुलांना शाळेतच उपचार केल्या जातात. ज्या मुलांना विशष उपचारांची आवश्यकता असते अशा मुलांना जिल्हा रूग्णालय वाशिम, उपजिल्हा रूग्णालय कारंजा, ग्रामीण रूग्णालय रिसाेड, मालेगाव, मंगरूळपीर व मानाेरा या ठिकाणी संदर्भ सेवा शिबीराचे आयाेजन करण्यात येते.


बाॅक्स : 

त्या बालकांवरील विविध शस्त्रक्रिया अगदी माे\त

हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील अपाेलाे हाॅस्पिटल, काेकीळाबेन हाॅस्पिटल, बालाजी हाॅस्पिटल, एस.आर.सी.सी. हाॅस्पिटल, जे. जे. हाॅस्पिटल, के.ई.एम. हाॅस्पिटल आणी ईतर ठिकाणी हृदयाच्या आजारावर माे\ त शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय हर्णीया, तिरळेपणा, अपेंडीक्स, दुभंगलेले ओठ व ईतर शस्त्रक्रिया जी.एम.सी. अकाेला, सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल अमरावती आणी जिल्हा सामान्य रूग्णालय वाशिम येथे शस्त्रक्रिया केल्या जातात.

0 Response to "१७० बालकांचा टू डी इकाे ; ३७ बालकांना हृदयविकार"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article