-->

आंतरराष्ट्रीय योग दिन :  पूर्व प्रशिक्षण उत्साहात

आंतरराष्ट्रीय योग दिन : पूर्व प्रशिक्षण उत्साहात



 साप्ताहिक सागर आदित्य 

आंतरराष्ट्रीय योग दिन :  पूर्व प्रशिक्षण उत्साहात


वाशिम, जिल्ह्यात १० वा  आंतरराष्ट्रीय योग दिन  २१ जुन २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. योग दिनाचा कार्यक्रम हा वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी वाटाणे लॉन येथे  आयोजित‌ करण्यात आला  आहे. 


जिल्हयातील विविध योग समिती, योग प्रशिक्षक, आयुष मंत्रालयाचे प्रतिनिधी, यांच्या वतीने सदरील कार्यक्रमास मार्गदर्शन व लाभणार आहे. योगदिनाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी शासकीय विविध

विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, पोलीस विभाग,जिल्हा परिषद,सर्व शैक्षणिक संस्था,क्रीडा क्षेत्रातील मान्यवर,क्रीडा पुरस्कारार्थी,खेळाडु व मार्गदर्शक , स्कॉऊट गाईड , एन.एस.एस.,एन.सी.सी.,

योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच वाशिम जिल्यातील जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरीष्ठ महाविद्यालय, ग्राम पंचायतच्या वतीने गावातील सर्व नागरीक यांनी कमीत कमी ५० च्या गटामध्ये एकत्र येऊन  २१ जुन २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ या कालावधीत योगाचे आयोजन करण्यात यावे. योग दिनाचे आयोजन व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी योग प्रशिक्षक यांना मार्गदर्शन म्हणुन दिनांक १८ ते १९ जुन २०२४ या दिवशी सकाळी १० ते १२ या कालावधीत योग प्रात्यक्षीकाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिटन

हॉल वाशिम या ठिकाणी करण्यात आले.

सदरचे कार्यक्रमास योग पुर्व प्रशिक्षण शिबीराचे प्रशिक्षक म्हणुन कु. तेजस्वणी अफुणे,संजय लहाणे,  निखील देशमुख, यांच्या चमुणे योग पुर्व प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे बाबत सविस्तर माहिती दिली. याबाबत अधिक 

माहिती www.ayush.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच वाशिम जिल्हायातील नागरिकांनी 

आपआपल्या संस्थेत,शाळेत, कार्यालयात मोठ्या प्रमाणात योग दिनाचे आयोजन करून

#आंतरराष्ट्रीययोगदिन२०२४, #IDY2024, Email ID : dos.washim23@gmail.com वर फोटोसह कार्यक्रम आयोजनाचा संपुर्ण अहवाल सादर करावा.  

योगदिन पूर्व प्रशिक्षणशिबीरास - केंद्र प्रमुख शिक्षण विभाग, शारीरिक शिक्षक, सहाय्यक शिक्षक, आशा सेविका या प्रशिक्षणाला उपस्थित होत्या. योग दिन पूर्व प्रशिक्षणास जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी

 लता गुप्ता  यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, पुष्पलता

अफुणे, केंद्र प्रमुख महाले, इ. मान्यवर पूर्व तयारी प्रशिक्षणास उपस्थित होते. तरी  जिल्हयातील योग दिन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात

साजरा करण्यासाठी शासकीय विविध विभागातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी, पोलीस

विभाग,जिल्हा परिषद सर्व शैक्षणिक संस्था, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा पुरस्कारार्थी,खेळाडु व मार्गदर्शक,

स्कॉऊट गाईड, एन.एस.एस.,एन.सी.सी, योग संघटना इत्यादी विभागाचे कर्मचारी उपस्थित असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आले. आज १९ जून रोजी सुध्दा योग प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिटन हॉल् या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. उर्वरित सर्व इच्छुक योग प्रशिक्षकांनी या प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेवुन २१ जुन रोजी सकाळी ६.१५ वाजता वाटाणे लॉन येथे आयोजित होणाऱ्या मुख्य योग दिवसा करीता उपस्थित

राहावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी कळविले आहे.

0 Response to "आंतरराष्ट्रीय योग दिन : पूर्व प्रशिक्षण उत्साहात"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article