-->

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी याबाबत तपशीलवार आढावा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी याबाबत तपशीलवार आढावा



 साप्ताहिक सागर आदित्य 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हागणदारीमुक्त झालेली गावे "मॉडेल" करण्यासाठी तालुकास्तरीय बैठकांच्या माध्यमातून ग्रामसेवकांचा आढावा घेण्यात येत आहे. 

गुरुवारी मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी याबाबत तपशीलवार आढावा घेऊन तालुक्यातील अधिकाधिक गावे 15 ऑगस्ट पर्यंत मॉडेल करण्याच्या सुचना दिल्या. 

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये शिवराज्याभिषेक दिन अर्थात 6 जून पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील गावे हागणदारी मुक्त अधिक "मॉडेल" करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यादरम्यान पंचायत समिती स्तरावर विस्ताराधिकारी आणि ग्रामसेवक यांना योग्य त्या सूचना देण्यात येत आहेत. यानंतर गावे मॉडेल करण्यासाठी गाव स्तरावरील आवश्यक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. काही गावांमध्ये यापूर्वीच कामे मार्गी लागली आहेत तिथे तांत्रिक बाबीची पूर्तता करून गावे ऑनलाईन मॉडेल घोषित करण्यात येत आहेत. 


तालुकास्तरावर सनियंत्रण समिती:

ओडिएफ प्लस अंतर्गत गावे मॉडेल करण्याच्या कामांना अधिक गती देण्यासाठी तालुकास्तरावर पाच ते सहा सदस्यांची एक संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. बैठकीदरम्यान प्रकल्प संचालक कोवे यांच्यामार्फत मंगरुळपीर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये श्रीधर शिंदे, संतोष काळे, ज्योती भगत, सीमा सुर्वे, प्रकाश ब्राह्मण आणि दीपा बेलखेडे यांचा समावेश आहे. ही समिती ओ. डी. एफ. प्लस अंतर्गत गावे "मॉडेल" करण्याबाबत ग्रामसेवकांचा पाठपुरावा करणार आहे.

बैठकीला गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने, जिल्हा कक्षाचे राम शृंगारे, शंकर आंबेकर आणि विस्तार अधिकारी भाऊराव बेलखेडकर, तालुका समन्वयक प्रवीण आखाडे आणि अभिजीत गावंडे यांची उपस्थिती होती. 

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू यांनी प्रत्येक ग्रामसेवकांमार्फत गाव मॉडेल करण्याबाबतची संभाव्य तारीख घेतली. दिलेल्या तारखांमध्ये गावातील कामे पूर्ण करून गावे ओडीएफ प्लस अंतर्गत मॉडेल करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

रिसोड, मानोरा, मंगरुळपीर आणि किलंजा तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बैठका घेण्यात आल्या असुन सोमवारनंतर वाशिम आणि मालेगाव तालुक्यामध्ये बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक जगदिश साहू यांनी दिली.

0 Response to "जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जगदीश साहू यांनी याबाबत तपशीलवार आढावा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article