-->

फलटण मध्ये पालखी आगमनातील ढिसाळ योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत ची मागणी

फलटण मध्ये पालखी आगमनातील ढिसाळ योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत ची मागणी

 




साप्ताहिक सागर आदित्य 

फलटण मध्ये पालखी आगमनातील ढिसाळ योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत ची मागणी  डराडो या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली.


गेल्या अनेक वर्षांपासून श्री ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या बंधूंचे पालखी फलटण मार्गे पंढरपूरला जाते. परंतु प्रत्येक वेळी नियोजनांमध्ये त्रुटी राहून जातात. त्यामुळे यंदाच्या वर्षी येणाऱ्या पालखी व सर्व भाविकांचे तसेच फलटण मधील नागरिकांचे योग्य पद्धतीने आरोग्याचे व स्वच्छतेचे नियोजन करण्यात यावे, त्यात  फलटण मधील पालखी मार्गावरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे ते तात्काळ नष्ट करावे.  फलटण मधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजाताई खरात या अनेक महिन्यांपासून मागणी करीत आहेत की, फलटणमध्ये अनेक सुलभ शौचालये निर्माण करण्यात यावीत, परंतु फलटणमध्ये चालू असलेल्या मुताऱ्या पाडण्यात आलेल्या आहेत. त्या तात्काळ उभारण्यात याव्यात ही विनंती, तसेच चालती फिरती सुलभ सौचालये जागोजागी उभी करण्यात यावीत जेणेकरून इतरत्र कोणी घाण करणार नाही. फलटणमध्ये पालखी आगमन वेळी व फलटण मधून पालखी प्रस्थानानंतर पाणीपुरवठा होतो त्यामध्ये क्लोरीनचे प्रमाण थोडे वाढविण्यात यावे, जेणेकरून जनमाणसात वाढणारे अनेक आजारांचे निर्मूलन करणे अगदीच सोपे होईल. तसेच डीडीटी पावडरचे अनेक हात मारण्यात यावेत (पालखी आगमनाच्या आधी आणि प्रस्थानानंतर ही).  पालखीसोबत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या तपासण्या व उपचार करण्यासाठी अनेक पथकांची निर्मिती करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात यावेत.


वरील प्रमाणे उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून फलटणकर व येणाऱ्या सर्व भाविकांचे आरोग्य उत्तम व निरोगी राहील अशा स्वरूपाची मागणी या निवेदनाद्वारे, डसऱ्याक असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेच्या डायरेक्टर डॉक्टर महेशकुमार धोंडीराम खरात व ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी फलटण प्रांत अधिकारी सचिन ढोले साहेब यांचेकडे केली.

0 Response to "फलटण मध्ये पालखी आगमनातील ढिसाळ योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत ची मागणी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article