२१,२२ फेब्रुवारीला सन्मती इंजिनिअरींग कॉलेजमध्ये महारोजगार मेळावा
साप्ताहिक सागर आदित्य
२१,२२ फेब्रुवारीला सन्मती इंजिनिअरींग कॉलेजमध्ये महारोजगार मेळावा
रोजगार इच्छुकांना मिळणार नोकरीची संधी - विद्या शितोळे
वाशिम : जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी वाशिममधील सन्मती इंजिनिरींग कॉलेज येथे २१ व २२
फेब्रुवारीला महारोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील रोजगार इच्छुकांना नोकरीची संधी मिळणार असून या मेळाव्याचा लाभ होण्याचे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.
रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाद्वारे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अथवा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन्मती इंजिनिरींग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ व २२
फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १०:३० ते दु. ४ वाजेदरम्यान सन्मती इंजिनिरींग कॉलेज, राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६, मालेगांव रोड, वाशिम येथे या महारोजगार मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले आहे.
या महारोजगार मेळाव्यात बॉश, टाटा मोटर्स, अॅडेको, सि-पॅट, नॉनस्टॉप सोल्यूशन्स, बजाज इलेक्ट्रीकल्स, आर्मस् प्रा. लि. इ. नामांकित कंपन्यासह एकुण ३० पेक्षा जास्त उद्योजक / कंपनी प्रतिनिधी या महारोजगार मेळाव्यात उपस्थित राहून दोन हजार पेक्षा जास्त रिक्तपदांसाठी प्रत्यक्षपणे रोजगार इच्छूक उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करणार आहेत.
इतर जिल्ह्यांसह वाशिम जिल्ह्यातील रोजगार इच्छुक स्त्री व पुरुष उमेदवारांनी रोजगार महास्वयंम www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डने लॉगीनद्वारे विविध पदासाठी पसंतीक्रम नोंदवावा. तसेच दि. २१ किंवा २२ फेब्रुवारी रोजी स्वतः प्रत्यक्षपणे आवश्यक कागदपत्रांसह स्वःखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे.
0 Response to "२१,२२ फेब्रुवारीला सन्मती इंजिनिअरींग कॉलेजमध्ये महारोजगार मेळावा"
Post a Comment