
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी रिसोड तालुक्यातील असोला येथे कार्यक्रम संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी
रिसोड तालुक्यातील असोला येथे कार्यक्रम संपन्न
वाशिम रिसोड तालुक्यातील आसोला येथे आज १ सप्टेंबर रोजी माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप ,नायब तहसीलदार नपते,मंडळ कृषी अधिकारी थोरात, सरपंच. श्रीमती पाचरणे , पोलीस उपनिरीक्षक , कनिष्ठ अभियंता महावितरण , प्रगतिशील शेतकरी संतोष घायाळ , भानुदास पाचरणे ,ग्रामसेवक श्रीमती उषा साठे ,तलाठ धांडे ,कृषी सहाय्यक श्रीमती कांबळे, कायंदे शिंदे खाडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अडचणींविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले व अष्टसुत्रीचा वापर करून उत्पादन वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी पोकरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेततळी व शेडनेटसाठी अर्ज करून घेण्यात आले. महिला बचत गटांना पीएमएफएमइ योजनेअंतर्गत अर्ज करून घेण्यात आले.कार्यक्रमाला आसोला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी रिसोड तालुक्यातील असोला येथे कार्यक्रम संपन्न"
Post a Comment