
पोषणाबद्दल जागरूकता असल्यास कुपोषण टाळणे शक्य मीनाक्षी भस्मे पोषण महिन्याचे उदघाटन
साप्ताहिक सागर आदित्य
पोषणाबद्दल जागरूकता असल्यास कुपोषण टाळणे शक्य
मीनाक्षी भस्मे
पोषण महिन्याचे उदघाटन
वाशिम आज १ सप्टेंबर रोजी वाशिमच्या
भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक ६७ मध्ये पोषण महिन्याचे उद्घाटन व जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न झाला.
भीमनगर येथील बौद्ध विहारामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.पोषण महिन्याचे उद्घाटन नागरी प्रकल्प अधिकारी मीनाक्षी भस्मे यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून शहरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे,बचत गट प्रमुख वंदना तुपसांडे,आशाबाई डोंगरदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बालकांच्या पोषणाबद्दल जागरूक असले तर कुपोषण कसे कमी होईल हे सांगताना श्रीमती भस्मे म्हणाल्या,कडधान्य जर मोड आणून खाल्ले तर त्यातील पोषक घटक वाढतात व तितक्याच पैशात अधिक पोषण आपण मिळवू शकतो. अशाप्रकारे उपलब्ध अन्न घटकांच्या वापराबद्दल श्रीमती भस्मे यांनी माहिती दिली.
तसेच व्यवहारे यांनी घोषणेबरोबरच आरोग्य व लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला परिसरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी सुनीता राऊत, रंजना पांडे,मीरा मुंद्रे,अनिता इंगोले, स्वाती जाधव,भारती गाभणे, बेबी खंडारे, वंदना वानखेडे, देशमुख इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रियंका बोरकर यांनी केले.आभार संगीता कांबळे यांनी मानले.
0 Response to "पोषणाबद्दल जागरूकता असल्यास कुपोषण टाळणे शक्य मीनाक्षी भस्मे पोषण महिन्याचे उदघाटन"
Post a Comment