-->

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे लोकशाहीच्या माध्यमातून शाळा नायकाची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे लोकशाहीच्या माध्यमातून शाळा नायकाची निवड

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे लोकशाहीच्या माध्यमातून शाळा नायकाची निवड

मुलांना लहानपणीच लोकशाहीचे बाळकडू मिळावे आणि शाळेच्या प्रकियेत विद्यार्थ्याचा सहभाग असावा यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा पं.स.मालेगाव येथे लोकशाही पद्धतीने शाळा नायकाची निवड आज दि.२७/८/२०२२ रोजी करण्यात आली.नियोजित कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांनी उभे राहण्यासाठी नामांकन अर्ज सादर केले.चार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले.यामध्ये मानसी दाभाडे,अजय दाभाडे,गायत्री दाभाडे,अभिषेक दाभाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारांनी आम्हाला निवडून दिले तर आम्ही शाळेसाठी काय करणार हे आपल्या भाषणातून सांगितले.प्रचारसाठी काही वेळ देऊन निवडणूक प्रकिया सुरू झाली.विद्यार्थ्यांना चिठ्ठी रुपी मतदान पत्रिका देण्यात आली.केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक संभाजी साळसुंदर यांनी काम पाहिले तर मतदान अधिकारी म्हणून तुकाराम इंगळे,रतन पट्टेबहादुर,विठ्ठल कालवे,संमती पंचवाटकर यांनी पाहिले.मतदान मोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला.यामध्ये  अभिषेक दाभाडे (१५),अजय दाभाडे(२४),गायत्री दाभाडे(२५),मानसी दाभाडे (१४),अवैध मात्र(३) अशी मते मिळाली.अटीतटीच्या लढतीत गायत्री दाभाडे हिने अजय दाभाडेचा फक्त १ मताने पराभव केला. शाळा नायक म्हणून गायत्री दाभडेची निवड झाली तर उप शाळा नायक म्हणून अजय दाभाडे ची निवड झाली.दोघांचेही पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह दिसून आला..





    

Related Posts

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घाटा येथे लोकशाहीच्या माध्यमातून शाळा नायकाची निवड"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article