आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त रॅली संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त रॅली संपन्न
वाशिम, : आज १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त रॅलीचे आोजन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय व श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविदयालय यांच्या संयुक्त विदयमाने हर घर तिरंगा आणि एड्स जाणिव जागृतीकरीता करण्यात आले. या रॅलीत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रा डॉ. किशोर वाहाने यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, समुपदेशक पंढरी देवळे, मिलींद घुगे, प्रा. नरवाडे, प्रा. राठोड, एनएसएस कार्यक्रम अधिकारी श्रीमती भारती देशमुख, प्रा. श्री. बारड, देशमुख व वक्ते म्हणून कृष्णा यांची प्रमुख उपस्थिती होती.
युनायटेड संघटनेचे युवा दिन २०२२ चे पिढीजात एकात्मता : सर्व वयोगटासाठी तयार करणे हे घोष वाक्य आहे. या घोष वाक्याने वाशिम शहर दुमदुमून गेले. ही रॅली श्री. रामराव सरनाईक महाविदयालय ते अल्लाडा प्लॉट मार्गे पाटणी चौका दरम्यान आयोजित करण्यात आली. या रॅलीचा समारोपीय कार्यक्रम श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविदयालयात घेण्यात आला. यावेळी महाविदयालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने विविध पथनाटय व गितांचे आयोजन करण्यात आले. हर घर तिरंगा आणि एचआयव्ही/ एडस या माहितीचे उपस्थितांना हस्तपत्रकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात श्री.रामराव सरनाईक समाजकार्य महाविदयालयाच्या विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. या रॅलीमध्ये श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविदयालय व जिल्हा एड्स नियंत्रण विभाग व आयसीटीसी, एसटीडी केंद्र जिल्हा रुग्णालय, वाशिमचे सहकार्य मिळाले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, पंढरी देवळे, मिलींद घुगे यांनी परीश्रम घेतले.
0 Response to "आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त रॅली संपन्न"
Post a Comment