-->

मौजे. कोयाळी ( बु ) रिठद येथील बौद्ध वस्तीतील रखडलेले स्मशानभूमीचे काम पूर्ण करा - गोपाल भिसडे

मौजे. कोयाळी ( बु ) रिठद येथील बौद्ध वस्तीतील रखडलेले स्मशानभूमीचे काम पूर्ण करा - गोपाल भिसडे



साप्ताहिक सागर आदित्य 

मौजे. कोयाळी ( बु ) रिठद येथील बौद्ध वस्तीतील रखडलेले स्मशानभूमीचे काम पूर्ण करा - गोपाल भिसडे

मौजे कोयाळी ( बु )रिठद येथील बौध्द वस्तीतील स्मशानभूमीचे अपूर्ण काम बऱ्याच दिवसाचे रखडलेले आहे,, सर्व बौद्ध वस्तीच्या वतीने अशी तक्रार आहे की मागील तीन वर्षापासून बौद्ध वस्ती मधील स्मशानभूमीचे काम अपूर्ण आहे,

ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच यांना बऱ्याचदा विनंती अर्ज केले परंतु त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत आहेत, आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये मृत व्यक्तींना कुठे अंत्यविधी करायचा हा प्रश्न सर्व बौध्द वस्तीतील लोकांना पडला असून ग्रामपंचायत बौद्ध वस्ती स्मशानभूमीच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करत आहे, त्यामुळे वेळेवर कोणतेही काम पूर्ण होत नाही आहेत,

 सध्या पावसाळा सुरू झालेला आहे या काळात जर कोणी बुद्ध व्यक्ती मरण पावला तर त्या व्यक्तीचे शव कुठे जाळायचे असा प्रश्न सध्या बुद्ध वस्तीतील लोकांना पडला आहे,

निधी उपलब्ध असताना देखील काम का होत नाहीत?

आमची समस्त गावकर्यांची वतीने हात जोडून विनंती आहे की गावप्रतिनिधिनी लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, आणि चांगली स्मशानभूमीचे काम पूर्ण 

 करून बौद्ध वस्ती स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा,,

आहे.


            




0 Response to "मौजे. कोयाळी ( बु ) रिठद येथील बौद्ध वस्तीतील रखडलेले स्मशानभूमीचे काम पूर्ण करा - गोपाल भिसडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article