-->

शासकीय बालकल्याण समितीचे गठण ! अध्यक्षपदी डॉ . अलका मकासरे

शासकीय बालकल्याण समितीचे गठण ! अध्यक्षपदी डॉ . अलका मकासरे


साप्ताहिक सागर आदित्य/

शासकीय बालकल्याण समितीचे गठण ! अध्यक्षपदी डॉ . अलका मकासरे

वाशिम : बहुप्रतिक्षेनंतर अखेर जिल्ह्यात शासकीय बालकल्याण समिती गठीत झाली असून , अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अलका मकासरे तर सदस्यपदी चार जणांची वर्णी लागली . महिला व बालविकास विभागांतर्गत बाल न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम २०१५ नुसार प्रत्येक जिल्ह्यात बालकल्याण समितीचे गठण केले जाते . अध्यक्ष पदासाठी यंदा ऑनलाईन पद्धतीने 3 क वा नि रु परीक्षा व अमरावती येथे मुलाखत अ प्रक्रिया पार पडली होती . जवळपास ३५ जणांनी परीक्षा व मुलाखत दिली होती . अध्यक्षपदी डॉ . अलका मकासरे यांची नियुक्ती झाली . सदस्य म्हणून विनोद पट्टेबहादूर , डॉ . मंजूश्री जांभरूणकर , बालाजी गंगावणे व अॅड . अनिल उंडाळ यांचा समावेश आहे . या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी राहणार आहे . बालकांना केंद्रस्थानी मानून त्यांची काळजी आणि हक्काचे संरक्षण करण्यासाठी सर्व समिती सदस्य प्रामाणिक प्रयत्न करू , असे डॉ . अलका मकासरे म्हणाल्या .





0 Response to "शासकीय बालकल्याण समितीचे गठण ! अध्यक्षपदी डॉ . अलका मकासरे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article