-->

हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवाव   षण्मुगराजन एस.

हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवाव षण्मुगराजन एस.

 



साप्ताहिक सागर आदित्य 

हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवाव           षण्मुगराजन एस.

       वाशिम, : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने नागरीकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या. या लढयातील क्रांतीकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणारा हर घर झेंडा हा उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन प्रभावीपणे राबविण्यात यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले.

          27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्याबाबत आयोजित आढावा सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक श्री. मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, कौशल्य विकास व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे व प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आलोक अग्रहरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

          षण्मुगराजन म्हणाले, 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर, कार्यालयावर, दुकानावर भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात यावा. नागरीकांना राष्ट्रध्वज सहज खरेदी करता येईल यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात ध्वज विक्री केंद्र निश्चित करावे. हर घर झेंडा हा उपक्रम राबवितांना भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. पुढील महिन्यात या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी. कोणत्या आकाराचे राष्ट्रध्वज घरी, कार्यालय आणि दुकाने यामध्ये लावण्यात यावे याबाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. असे त्यांनी यावेळी सांगीतले.

           हिंगे यांनी भारतीय ध्वजसंहिता 2006 याबाबतची माहिती दिली. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांनी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती मोहिम या उपक्रमासाठी प्रभावीपणे राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्व सामान्य नागरीकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करुन हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा. असे  हिंगे यांनी यावेळी सांगितले. सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

Related Posts

0 Response to "हर घर झेंडा हा उपक्रम प्रभावीपणे राबवाव षण्मुगराजन एस."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article