-->

पर्यावरण दिन वृक्षारोपण तसेच ग्रामस्थांना पर्यावरणाचे संरक्षण करणे बाबत संदेश

पर्यावरण दिन वृक्षारोपण तसेच ग्रामस्थांना पर्यावरणाचे संरक्षण करणे बाबत संदेश

 मालेगाव साप्ताहिक सागर आदित्य 

विपुल राठोड  उपवसंरक्षक वाशिम वनविभाग वाशिम व  सुहास मोरे  वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरा ,मेडशी,  किन्हीराजा ,अमाना, मुंगळा वर्तुळामध्ये   5 जून जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण तसेच ग्रामस्थांना पर्यावरणाचे संरक्षण करणे बाबत संदेश देऊन साजरा करण्यात आला.

जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जागतिक पर्यावरण दिवस या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे.

जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन ( CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.





Related Posts

0 Response to "पर्यावरण दिन वृक्षारोपण तसेच ग्रामस्थांना पर्यावरणाचे संरक्षण करणे बाबत संदेश"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article