एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू प्रवेश परीक्षेसाठी अर्ज ५ मे पर्यंत सादर करावे
साप्ताहिक सागर आदित्य/
एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
प्रवेश परीक्षेसाठी अर्ज ५ मे पर्यंत सादर करावे
वाशिम - सन २०२२-२३ शैक्षणिक वर्षात आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यान्वीत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल रेसीडेन्सीयल स्कुलमधील प्रवेशासाठी ५ जुन २०२२ रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये ५ वी, ६ वी, ७ वी व ८ वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमाती विद्यार्थी पात्र राहतील.
या सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी प्रवेश परीक्षेचे आवेदन पात्र विद्यार्थ्यांकडून भरून घेवून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला कार्यालयाकडे सादर करावे. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय अथवा अनुदानित आश्रम शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. सदर अर्ज ५ मे २०२२ पर्यंत प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकामार्फत सादर करावे. सदर प्रवेश परीक्षा ५ जुन रोजी सकाळी ११ ते दु १ वाजेदरम्यान शासकीय आश्रमशाळा कोथळी ता. बार्शिटाकळी जि अकोला व घाटबोरी ता. मेहकर येथे घेण्यात येणार आहे, असे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.
0 Response to "एकलव्य निवासी शाळा प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू प्रवेश परीक्षेसाठी अर्ज ५ मे पर्यंत सादर करावे"
Post a Comment