जिल्हयात मिशन वात्सल्य आठवडा राबविण्यात आला
साप्ताहिक सागर आदित्य/
वाशिम - बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प वाशिम अंतर्गत रिसोड मंगरूळपीर वाशिम कारंजा लाड चारही नगरपरिषद क्षेत्रांमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण व नागरी भागातील करणामुळे विधवा झालेल्या महिलांना आमंत्रित करून मिशन वात्सल्य अंतर्गत विविध पंचवीस योजनांची माहिती देण्यात आली यामध्ये विशेषतः महसूल विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अपंग निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी वृद्ध निराधार योजना शिधापत्रिका इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच लाभार्थींना लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता केल्यास योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असल्याबाबत आश्वस्त केले जिल्हा महिला व बालविकास कार्यालय अंतर्गत बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा माहिती देण्यात आली बालसंगोपनाचे बरेच लाभार्थींचे प्रस्ताव मंजूर झाले असून आणखी सुद्धा काही लाभार्थी सुटले असल्यास त्यांना अर्ज करण्याविषयी विनंती केली कृषी व घरकुल विषयक योजनांचा लाभ घेण्याकरिता संबंधित कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता पात्र निकष अटीनुसार करण्याबाबत सूचित केले या संपूर्ण कार्यक्रमाकरिता बालविकास प्रकल्प कार्यालय नागरी व ग्रामीण तहसील कार्यालय पंचायत समिती यांनी संयुक्तपणे जबाबदारीने काम केले तसेच जागतिक महिला दिना निमित्त संपूर्ण आठवडाभर 8 ते 14 मार्च पर्यंत मिशन वाचले आठवण राबविण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्याची कार्यवाही विविध विभागांमार्फत सुरू आहे.
0 Response to "जिल्हयात मिशन वात्सल्य आठवडा राबविण्यात आला"
Post a Comment