
निकृष्ट रस्ता कामाची गुणनियंत्रण चाचणी करा
साप्ताहिक सागर आदित्य/
निकृष्ट रस्ता कामाची गुणनियंत्रण चाचणी करा
संजय खंडारे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
वाशिम - तालुक्यातील बोराळा ते पिंप्री अवगण रस्ता डांबरीकरण जि.प. अंतर्गत रस्ता काम एक कोटी रुपये निधीचे होत असून , हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सोयता येथिल संजय खंडारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली .
निवेदनात नमुद केले की , बोराळा ते पिंप्री अवगण रस्ता डांबरीकरण होणार असून , हे काम निकृष्ट दर्जाचे असून , या कामाची वरीष्ठांनी गुणनियंत्रण चाचणी करावी . तसेच या रस्त्याचे काम थातुरमातुर पध्दतीने सुरु असल्याचे दिसून येत आहे . याकडे या कामाची त्वरीत तपासणी करून बोराळा ते पिंप्री अवगण रस्त्याचे काम थांबवावे , अशी मागणी संजय खंडारे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे .
0 Response to "निकृष्ट रस्ता कामाची गुणनियंत्रण चाचणी करा"
Post a Comment