-->

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि  महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ),  मार्फत जागतिक महिला दिन साजरा

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), मार्फत जागतिक महिला दिन साजरा


साप्ताहिक सागर आदित्य/

जागतिक महिला दिन २०२२

आमखेडा - कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि  महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ),  मार्फत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मा.ब्रम्हकुमारी स्नेहलता दीदी  या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी  मा.  सौ. मनोरमा माणिकराव जोगदंड   उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.

प्रमुख पाहुण्या ब्रम्हकुमारी स्नेहलता दीदी यांनी नारी शक्ती  या विषयावर मार्गदर्शन केले तर अध्यक्ष सौ. मनोरमा माणिकराव जोगदंड यांनी स्त्री जीवन प्रेरणादायी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर  गावातील प्रतिष्टीत महिला  सौ. सुभिताबाई जोगदंड  , सौ . सुशीला जोगदंड , सौ .शशिकला जोगदंड ,सौ .लक्ष्मी जोगदंड  , सौ. ज्योती ताई जोगदंड  आणि सौ. वृंदाताई बंसोड  हे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रथम  वर्षातील  विद्यार्थी अविनाश कांबळे  आणि  भाग्यश्री शितोळे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि गावातील प्रतिष्टीत महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षांचा राहुल अंधारे व प्रस्ताविक संकेत राऊत  यांनी केले तर कृषि महाविद्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड यांनी सर्वांचे  आभार व्यक्त केले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने   महाविद्यालय तर्फे सर्व मान्यवरांचा  याचा पुष्प आणि प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

        या कार्यक्रमासाठी विद्यार्थांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  एस. एम. जाधव, मा. अजिंक्य पिसाळ सर ( कृषि अधिकारी), प्रा. पी. टी. निचळ, डॉ. आर. एस. करंगामी, प्रा. पुर्वी गुप्ता मॅडम,प्रा.  मोक्षदा पाटील मॅडम, आरती पंचबुद्धे मॅडम  व सर्व प्राद्यापक  वृंदाचे मार्गदर्शन लाभले. 





0 Response to "कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, आमखेडा ( अहिंसातिर्थ), मार्फत जागतिक महिला दिन साजरा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article