-->

सहभागी ग्रामीण मूल्यांकनातून (PRA)  मधून विद्यार्थ्यांनी उलगडला ग्राम विकासाचा मार्ग

सहभागी ग्रामीण मूल्यांकनातून (PRA) मधून विद्यार्थ्यांनी उलगडला ग्राम विकासाचा मार्ग

 


साप्ताहिक सागर आदित्य/

सहभागी ग्रामीण मूल्यांकनातून (PRA)  मधून विद्यार्थ्यांनी उलगडला ग्राम विकासाचा मार्ग


वाशिम 22 डिसें : स्थानिक श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय,  वाशिम  येथील  समाजकार्य पारंगत भाग 2 च्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून   समुदाय संघटन अंतर्गत 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान ग्रामविकास ही संकल्पना जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी गावाच्या पाहणीसाठी शिवारफेरीच्या माध्यमातून गावातील नैसर्गिक  संसाधनाचे  स्रोत याविषयी माहिती घेतली तसेच त्यांनी सामाजिक सर्वेक्षनातून गावातील सामाजिक  संरचना जाणून घेतली. गावातील समुहाच्या गृह भेटी घेऊन विविध समस्याविषयी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामविकासाच्या हंगामी समस्या  तसेच मागील दशकातील ग्राम विकास यांविषयी अभ्यास विद्यार्थ्यांनी  केला.   गावाचा सामाजिक समायोजन  पद्धत याविषयीं  व्यक्तीसाहकार्याच्या  माध्यमातून जाणून घेतले .  गावातील लक्ष  केंद्रित गटाच्या   चर्चाचे आयोजन करून त्यांना समुपदेशन केले. ग्रामस्तरावर  असलेल्या समस्याचं अनुषंगाने सहभागी ग्रामीण मूल्यांकन (PRA)  आराखद्याच्या साहाय्याने व प्रत्यक्ष ग्राम अध्ययनातून  समोर आलेल्या समस्या  याविषयीं  विद्यार्थ्यांनी समस्या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून  विविध उपक्रम राबविले.  विद्यार्थ्यांनी रॅलीचा माध्यमातून ग्राम स्वच्छतेचा व लसीकरणाचा  संदेश दिला. गावामध्ये आरोग्य समस्या  लक्षात घेऊन  विविध आजार याविषयी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील समूहाला बालविवाह प्रतिबंध  याविषयी गावकर्यांचे प्रबोधन केले,बालविवाहाचे परिणाम व कायदेविषयक तरतुदी पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली. लोकशाही  बळकट  करण्यासाठी मतदार जनजागृती अभियान  अंतर्गत शासकीय मतदार नोंदणी याविषयी लोकांचे प्रबोधन करण्यात आले.गावातील लोकांसाठी ग्राम स्तरावरील  असलेल्या योजना व त्यांच्या उपयोग  अडचणी  सोडविण्यासाठी  महत्वाचे कार्य केले.संबंधित कार्य भीमराव वानखेडे, राम भाकरे, शुभम राठोड, पवन दहातोंडे, मीनल मेघाडे, मोनिका हिरवे , राणी डाखोरे,पूजा तायडे , मनीषा बेले, पूनम माटरवाड,मंजू राठोड,पूजा खडसे,विनायक महल्ले, आकाश जाधव, यांनी  यांनी परिश्रम घेतले. यासाठी विद्यार्थ्यांना   प्रा पंढरी गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक सरनाईक, पठाण , नंदा  अंभोरे अंगणवाडी सेविका , उपसरपंच काळबांडे आदी मान्यवरचे सहकार्य लाभले.








0 Response to "सहभागी ग्रामीण मूल्यांकनातून (PRA) मधून विद्यार्थ्यांनी उलगडला ग्राम विकासाचा मार्ग"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article