-->

ग्रामिण कुटुंबांना शुध्द पाणी मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे: वसुमना पंत यांचे आवाहन

ग्रामिण कुटुंबांना शुध्द पाणी मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे: वसुमना पंत यांचे आवाहन


 साप्ताहिक सागर आदित्य/

ग्रामिण कुटुंबांना शुध्द पाणी मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे: वसुमना पंत यांचे आवाहन


वाशिम :


जल जीवन मिशनच्या माध्यमातुन प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुध्द पाणी देण्यात येणार आहे. यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गावातील नळ योजना प्राधान्याने पुर्ण कराव्यात असे ‍निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी बैठकित दिले.


ग्राम स्तरावर घरगुती नळ जोडणी, शाळा- अंगणवाडी नळ जोडणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जि. प. च्या सीईओ पंत यांनी बुधवार पासुन सलग 5 तालुक्यांच्या बैठका स्थानिक वसंतराव नाईक सभागृहात घेतल्या होत्या. आज (7/12) वाशिम तालुक्यातील ग्रामसेवक, अभियंते यांची बैठक घेऊन जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले.


प्रत्येक ग्रामिण कुटुंबांना प्रती व्यक्ति प्रतीदिन 55 लिटर शुध्द पिण्याचे पाणी कार्यान्वित नळाद्वारे मिळावे या उद्देशाने जल जीवन मिशन  हे विशेष अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाशिम जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना शुध्द पाणी मिळण्याच्या तळमळीने सर्वांनी काम करावे असे आवाहन सीईओ पंत यांनी केले. सर्वच गावांचे आराखडे तयार असुन आता पुढील योजनेची कामे विहित मुदतीत पुर्ण करावे तसेच शाळा व अंगणवाडी यांना पिण्याच्या पाण्यासाठी व शौचालयासाठी स्वतंत्र नळ कनेक्शन देऊन त्याबाबत माहिती संकेतस्थळावर अद्यावत करण्याचे निर्देश दिले.


… तर चुकीची माहिती दिली म्हणुन कारवाई करणार!


शाळा व अंगणवाडी यांना स्वतंत्र नळ जोडणी नसतांना काही गावांची ऑन लाईन एंट्री करुन नळ जोडणी असल्याचे दर्शविण्यात आले. मात्र ग्रामसेवक, अभियंता व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचा एकत्रित गावनिहाय आढावा घेत असतांना हा धक्कादायक प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आला. ऑन लाईन केलेली माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दोन दिवसात पडताळुन पाहुन अहवाल सादर करावा, यात तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली म्हणुन संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करणार असल्याचा ईशारा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिला.


बैठकिला पंचायत विभागाचे जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे यांची उपस्थिती होती.



0 Response to "ग्रामिण कुटुंबांना शुध्द पाणी मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे: वसुमना पंत यांचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article