-->

कर्मयोगी बाबारवजी जोगदंड कृषी महाविद्यालय अंतर्गत राबविले जनजागृती अभियान.

कर्मयोगी बाबारवजी जोगदंड कृषी महाविद्यालय अंतर्गत राबविले जनजागृती अभियान.


 साप्ताहिक सागर आदित्य/

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषी महाविद्यालया अंतर्गत राबविले जनजागृती अभियान.

  वाशिम दि.२९ नोव्हें : मौजे काटा तालुका जिल्हा येथे

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वाशिम आणि कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आमखेडा व कृषी विभाग वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आज काटा येथे  कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी जनजागृती अभियान राबविण्यात आले   या कार्यक्रमाला उपस्थित  काटा ग्रामपंचायत चे सरपंच मोरे   तालुका कृषी अधिकारी वाशिम  अनिल कंकाळ  प्रा.शशिकांत वाकुडकर व प्रा. दिगंबर बोरकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वाशिम  जयप्रकाश लव्हाळे,  उपस्थित होते सर्वप्रथम या मध्ये प्रभात फेरी  व  नंतर कीटकनाशक हाताळताना घ्यावयाची काळजी यावर नाटक सादर केले व त्यानंतर  शेतकऱ्याची कार्यशाळा घेण्यात आली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना शाश्वत शेती करत असतांना गांडूळ खताचा वापर पक्षी तांबे लावण कामगंध सापळे लावण शेतीत कमी खर्चाच्या उपाययोजना करून शेतीचा लागत खर्च कमी करून उत्पन्नात वाढ कशी करता येईल याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच आत्माच्या विविध योजनांची माहिती दिली  व तालुका कृषी अधिकारी  अनिल कंकाळ यांनी महाडीबीटी व शेतकऱ्यांसाठी प्रचलित योजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी द्वारे अर्ज करण्याविषयी आवाहन केले तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पण शेतकर्‍यांमध्ये जाऊन जनजागृती करावी व कृषी विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही केले. त्यानंतर शिवार फेरी घेण्यात आली व त्यामधे शेतकऱ्यानं कामगंध सापळे कसे लावावे याबदल माहिती दिली व शेतकऱ्यांना फेरोमोन ट्रॅप चे वाटप  करण्यात आले हे कार्यक्रमा चे यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक राजेश छत्रे, राहुल दंडे, महादेव वाणी सहकार्य केले तसेच कृषी महाविद्यालया आमखेडा येथील प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ वर्षाचे ८७ विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेऊन विशेष कार्य केले त्याबद्दल त्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या जनजागृती मोहिमेत काटा येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी महाविद्यालय आमखेडा यांचेकडून प्राध्यापक  वाकुडकर व  बोरकर  यांनी सर्वांचे आभार मानले.




0 Response to "कर्मयोगी बाबारवजी जोगदंड कृषी महाविद्यालय अंतर्गत राबविले जनजागृती अभियान."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article