ओडिएफ प्लसबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व आॅपरेटरची कार्यशाळा
ओडिएफ प्लसबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व आॅपरेटरची कार्यशाळा
वाशिम दि 28 :
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस) बाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम पंचायत आॅपरेटर यांच्या दोन दिवशिय कार्यशाळेचे आयोजन दि. 29 व 30 डिसेंबर रोजी नियोजन भवन येथे करण्यात आले आहे.
जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जि.प. उपाध्यक्ष डाॅ श्याम गाभणे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, सभापती, चक्रधर गोटे, वनिता श्रावण देवरे, शोभा गावंडे, सुरेश मापारी यांची उपस्थिती लाभणार आहे. मुंबई येथील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ हे कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले यांनी केले.
0 Response to "ओडिएफ प्लसबाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व आॅपरेटरची कार्यशाळा"
Post a Comment