अमली पदार्थ सेवनातून उद्भवू शकतात मानसिक विकृती:- सुनील सुर्वे
साप्ताहिक सागर आदित्य/
अमली पदार्थ सेवनातून उद्भवू शकतात मानसिक विकृती:- सुनील सुर्वे अतिप्रमाणात व दीर्घकाळ अंमली पदार्थ सेवना मुळे व्यक्तीच्या बोधात्मक वर्तनात्मक भावनात्मक घटकांवर विक्षिप्त परिणाम घडून येतो अमली पदार्थ आसक्ती निर्माण झालेल्या व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते व्यक्तीचे कौटुंबिक व्यवसायिक व सामाजिक जीवन उध्वस्त होते अनेक व्यसनाधीन व्यक्तीच्या गुन्हेगारी जगाशी संबंध येतो म्हणून व्यवसनासक्ती ही समाजासमोरील मोठी समस्या बनली आहे असे मत मनोविकृती सामाजिक कार्यकर्ते सुनील सुर्वे यांनी रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे "व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या व व्यसनाधीनतेमुळे मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम"या विषयावर मार्गदर्शक म्हणून बोलत होते राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पंढरी गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समुपदेशक रामकृष्ण धाडवे,राम सरकटे
प्रमुख उपस्थिती प्राध्यापक राठोड,प्राध्यापक पवार, प्राध्यापक वानखेडे,हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव जाधव यांनी केले सूत्रसंचालन स्वरूपा ईहारे तर आभार प्रदर्शन श्रावणी राजनकर यांनी मानले.
0 Response to "अमली पदार्थ सेवनातून उद्भवू शकतात मानसिक विकृती:- सुनील सुर्वे"
Post a Comment