-->

कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठीच एफडीए कडून औषध विक्रेत्यांची मुस्कटदाबी! -अनिल नावंदर

कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठीच एफडीए कडून औषध विक्रेत्यांची मुस्कटदाबी! -अनिल नावंदर

 


साप्ताहिक सागर आदित्य/

कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठीच एफडीए कडून औषध विक्रेत्यांची मुस्कटदाबी! -अनिल नावंदर


मुंबई : - अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त यांनी परवानाधारक औषध विक्रेत्यांवर कारवाई प्रस्तावित करणारे परिपत्रक काढले असून सदरहु परिपत्रक कार्पोरेट कंपन्यांना औषध वितरण क्षेत्रांत भक्कमपणे पाय रोवण्यास मदत करण्यासाठीच असल्याचे मत राज्य केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी व्यक्त केले आहे. सदर परिपत्रकाची अंमलबजावणी तात्काळ रद्द न केल्यास संघटनेस आंदोलनात्मक भुमिका घ्यावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.


अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्री. परीमल सिह यांनी एक परिपत्रक काढून औषध विक्रेत्यांनी क्षुल्लक चूका जरी केल्या तरी त्याला कमीत कमी १५ दिवसाचे निलंबन आदेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. औषध वितरण क्षेत्रात रिलायन्स, टाटा, अपोलो, मेडप्लस यासारख्या विविध कार्पोरेट कंपन्यांनी शिरकाव केला असुन त्यांच्याकडून होणाऱ्या बेकायदेशिर गोष्टी व व्यवसाय याबाबत अनेक वेळा प्रशासनास पुराव्यासहीत कागदपत्रे सादर करुनही कारवाई होत नसल्यामुळे संघटनेने याकडे होणारे दुर्लक्ष व शासन व प्रशासनाची संशयास्पद भुमिका लक्षात आल्यामुळे त्याबाबत पत्र व्यवहार करणेच बंद केले त्याऐवजी येणाऱ्या स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्याची भुमिका सभासदांनी व संघटनेने स्विकारली. 


कार्पोरेट कंपन्यांच्या बेकायदेशिरपणे सुरु असलेल्या व्यवसायिक पद्धतीकडे दुर्लक्ष करुन पारंपारिक औषध विव्रेâत्यास वेठीस धरण्याचा प्रयत्न म्हणजेच हे परिपत्रक होय. यामुळेच या शंकेस वाव मिळतो की हे परिपत्रक कार्पोरेट वंâपन्या, शासन व प्रशासन यांचे परवानाधारक औषध विव्रेâत्यांविरुध्द षडयंत्र तर नाही ना? ज्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे त्यांना मोकाट सोडून कायद्याचे पालन करुन परंपरागतपणे औषध विक्री करणाNया  औषध विक्रेत्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही असेही नावंदर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.


संघटनेने शासन आणि प्रशासन यांच्याकडे यापूर्वी मायनर आणि मेजर चुकांसाठी नियमावली पाठवली होती त्याचा कुठलाही विचार परिपत्रक काढतांना केला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. संघटने बरोबर चर्चा विनिमय करून परिपत्रक जारी करावे तोपर्यंत सदरहु परिपत्रकास स्थगीती देण्यात यावी अन्यथा संघटनेला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल व त्यामुळे औषध वितरणात अडचणी निर्माण झाल्यास संघटना व सभासद जवाबदार राहणार नाहीत व याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असेही अनिल नावंदर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


आपला, 

राजेश पाटील सिरसाट

अध्यक्ष केमिस्ट & ड्रगिस्ट असो.वाशिम जिल्हा

0 Response to "कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठीच एफडीए कडून औषध विक्रेत्यांची मुस्कटदाबी! -अनिल नावंदर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article