शरद ॠतुचर्या आणि विरेचन
साप्ताहिक सागर आदित्य
प्रतिनिधि / तुळशीराम जोगदंड :
शरद ऋतुला _'रोगस्य माता शारदी’_ सर्व रोगांची माता असे म्हटले जाते.
वर्षा ऋतूमधे संचित झालेले पित्त शरद ऋतूमधे सुर्याच्या वाढत्या ऊष्णतेमुळॆ *(ऑक्टोबर हिट)* प्रकुपित होते. य़ाचा परिणामस्वरुप शरीरामध्ये डोकेदुखी, मळमळणे, अपचन, पित्त्ताच्या उलट्या होणे, जुलाब, ताप येणे, मुळव्याध, अंग खाजवणे, अंगावर लाल चट्टे उठणे (कोठ, शीतपित्त) ई. प्रकारचे पित्तजन्य आजार वाढीस लागतात. वाढलेल्या पित्त्ताला शांत केले तर त्यापासुन होणारे आजार सुध्दा मुळापासुन नाहीसे होतील आणि आरोग्यप्राप्ती होईल. परंतु याचा वेळीच ऊपाय केला नाही तर कालांतराने हेच वाढलेले दोष मायग्रेन, पोटाचा घेर वाढणे, अम्लपित्त्त, पित्त्ताशयात खडॆ होणे, कावीळ, मेदोरोग, मलेरिया, डेन्गु, फ़िशर, भगन्दर, कुष्ठ, सोरायसिस, फ़ंगल इन्फ़ेक्शन, खरुज, नागिण, रक्तदाब वाढणे यासारखे आजार उत्पन्न करतात.
_मुळात दोष (वात,पित्त्त,कफ) वाढूच न देणे आणि जर वाढलेच तर अपायरहीत पध्दतीने त्याला प्राकृत स्वरुपात घेऊन येणे हा आयुर्वेदाचा सिध्दांत आहे._ यासाठीच आयुर्वेदामधे दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म, पथ्यापथ्य यांचे सविस्तर वर्णन केलेले आहे
स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकण्यासाठी प्रत्येक ऋतुमध्ये वाढलेल्या दोषांचे निर्हरण पंचकर्म संशोधनद्वारे करावे म्हणूनच शरद ऋतुमध्ये वाढलेल्या पित्ताचे निर्हरण करण्यासाठी विरेचन सांगितलेले आहे.
*विरेचन म्हणजे काय?*
दोषांना अधोमार्गाने अर्थात गुदावाटे बाहेर काढून टाकण्याच्या शोधन प्रक्रियेला विरेचन म्हटले जाते.
_विरेचन पित्तहराणां (श्रेष्ठः)_ असे चरकाचार्यांनी म्हटले आहे. आचार्य सुश्रुतांनी एक फार सुंदर दृष्टांत देऊन विरेचनाचे पित्तरोगहर्तृत्व स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की एखाद्या जलाशयातील जल नाहीसे केले तर जलाच्या आश्रयाने राहणार्या कमलादि जलवनस्पती, मासे आदी जलचर या सर्वांचाच जसा नाश होतो तद्वत् विरेचनाने पित्ताचे शोधन केल्याने या पित्ताच्या आश्रयाने निर्माण होणारे अनेकविध रोग आपोआपच नष्ट होतात._हा विरेचनविधी फक्त रोग्यांनीच न करता स्वस्थ माणसांनीही त्यांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने करावा._
*शरद ऋतू मधे काय करावे आणि काय करु नये हे खालील प्रमाणे*
_पथ्यकर आहार_ :-
गहु, ज्वारी, तांदूळ, मुग, मसुर, पडवळ, आवळा, मध, साखर (खाण्ड), मधुर, कडू, तुरट, गाईचे दुध, गाईचे तुप, लोणी, डाळिंब, केळी(वेलची सहित), हलका आहार ई.पदार्थांचे सेवन.
_पथ्यकर विहार_ :-
अभ्यंग, सुगंधी पुष्पमाळा धारण करणे, ब्रह्मचर्य पालन, कडक भुक लागल्यानंतर जेवणे, सायंकाळी चांदण्याच्या प्रकाशात बसणॆ.
_अपथ्यकर आहार_ :-
बाजरी, साबुदाणे, लोणचॆ, उडीद, दही, आंबट ताक, गोमुत्र, बादाम, पिस्ता, काजू, तिक्ष्ण मद्य, नवीन गुळ, तेल, आंबट, खारट, तिखट, ऊष्ण ई. पित्त्तकर पदार्थांचे अधिक मात्रेत सेवन,
_अपथ्यकर विहार_ :-
पुर्व दिशेने येणारा वारा, दिवसा झोपणे, आकंठ जेवणे, ऊन्हामधे फिरणे, रात्री खुल्या आकाशाखाली झोपणे, आतिमैथुन, रात्रीजागरण.
*अधिक महितीसाठी संपर्क*
वैद्य विष्णु देविदास सावंत
मोब. क्र. *7798172713*
श्री समर्थ आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय.
सिंहगड दर्शन, सिंहगड रोड,
धायरी फाट्याजवळ, वडगांव खुर्द पुणे ६८.
0 Response to " शरद ॠतुचर्या आणि विरेचन"
Post a Comment