वसंतराव नाईक विद्याल मानोरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्याल मानोरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
वसंतराव नाईक विद्यालयात, मानोरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात
आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर उपस्थित होते. त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला तसेच विनम्र अभिवादन करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याला उजाळा दिला.
यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या समता, सामाजिक न्याय, शिक्षणप्रेम आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात पुढे जाण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
0 Response to "वसंतराव नाईक विद्याल मानोरा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी"
Post a Comment