'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये योगदान द्यावे: किरण कोवे
साप्ताहिक सागर आदित्य
'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये योगदान द्यावे: किरण कोवे
गावाचा संपूर्ण कायापालट करण्याची ताकद असलेल्या 'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान' मध्ये जिल्ह्यातील विषय तज्ञांनी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी केले.
बुधवारी येथील ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या स्वच्छता विषयक विविध कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सार्वजनिक शौचालय, वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रकल्प संचालक किरण कोवे यांनी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान' बाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या समाजकार्यातील दीर्घ अनुभवाच्या आधारे जिल्ह्यातील इतर गावांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.
जिल्ह्यातील सर्वच गावांनी या योजनेअंतर्गत स्पर्धेमध्ये भाग घेतला असला तरी जी गावे यासाठी मेहनत घेत आहेत त्या गावांना जिल्हा परिषदेतील विषयतज्ञ व सल्लागार यांनी भेटी द्याव्या. सुरुवातीला जी गावे यामध्ये आघाडीवर आहेत त्यांना प्रोत्साहित करावे आणि स्पर्धेमध्ये गाव कसे पात्र ठरेल याची तयारी करून घ्यावी अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांची उपस्थिती होती.
0 Response to "'मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायतराज अभियान' मध्ये योगदान द्यावे: किरण कोवे"
Post a Comment