-->

गहाळ झालेले 25 मोबाईल मालकाला परत सायबर पोलीस स्टेशन ची कारवाई

गहाळ झालेले 25 मोबाईल मालकाला परत सायबर पोलीस स्टेशन ची कारवाई



साप्ताहिक सागर आदित्य 

गहाळ झालेले 25 मोबाईल मालकाला परत सायबर पोलीस स्टेशन ची कारवाई

  वाशिम दि.27 सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी जिल्ह्यातील 25 जणांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारीवरून सी. ई. आय. आर. पोर्टल वरून शोध घेऊन पोलिस अधीक्षक  अनुज तारे यांच्या हस्ते तक्रारदारास दि. 27 फेब्रुवारी रोजी परत करण्यात आले. परत करण्यात आलेल्या 25 मोबाईलची किंमत अंदाजे दोन लाख ऐंशी हजार रुपयांच्या जवळपास होती. या संदर्भात मोबाईल हरवलेल्या नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली त्यावरून CEIR पोर्टल च्या माध्यमातून मोबाईलचा शोध घेण्यात आला. सदरची कार्यावाही हि  पोलिस अधीक्षक  अनुज तारे सा व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे साहेब, पोकाॅ वैभव गाडवे,मपोकाॅ पुष्षा मनवर यांनी सहकार्य केले. यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल गहाळ झाल्यास संबंधित पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिस स्टेशन वाशिम च्या वतीने करण्यात आले.

0 Response to "गहाळ झालेले 25 मोबाईल मालकाला परत सायबर पोलीस स्टेशन ची कारवाई"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article