-->

कुंभमेळा प्रयागराज  भाविकांनी आवश्यक दक्षता घ्यावी  जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कुंभमेळा प्रयागराज भाविकांनी आवश्यक दक्षता घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन


 साप्ताहिक सागर आदित्य 

कुंभमेळा प्रयागराज

भाविकांनी आवश्यक दक्षता घ्यावी

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वाशिम,

उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथे कुंभमेळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज येथे दर्शनासाठी जात आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे महत्त्वाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयागराज नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण कक्ष, तसेच वाशिम जिल्हा प्रशासनाचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत—


✅ प्रयागराज नियंत्रण कक्ष: ☎ 0522-2237515

✅ मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई: ☎ 022-22027990

✅ विभागीय नियंत्रण कक्ष, अमरावती: ☎ 0721-2661364

✅ जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम: ☎ 07252-234238

✅ जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, वाशिम: ☎ 07252-234834


भाविकांनी घ्यावयाच्या आवश्यक दक्षता:

✔ गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा व आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

✔ ओळखीच्या लोकांसोबत राहा आणि आपल्या नातेवाईकांना प्रवासाबाबत माहिती द्या.

✔ आपले महत्त्वाचे कागदपत्र आणि ओळखपत्राची प्रत सोबत ठेवा.

✔ आपत्कालीन परिस्थितीत वरील दिलेल्या संपर्क क्रमांकांवर त्वरित संपर्क साधा.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0 Response to "कुंभमेळा प्रयागराज भाविकांनी आवश्यक दक्षता घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article