साप्ताहिक सागर आदित्य/
तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ . किरण जाधव यांचा,पतंजली योगशिक्षीका अर्चना कदम यांचेकडून भव्य सत्कार !
कारंजा : येथून जवळच असलेल्या, मौजे उंबर्डाबाजार येथे संत श्री गजानन मन्दिर सभागृहात नुकताच आजादी का अमृत महोत्सव" सप्ताहानिमित्त आणि महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान भारत योजना अंतर्गत
उंबर्डा येथील आरोग्य अधिकारी डॉ नांदे यांच्या मार्गदर्शनानूसार पतंजली योग शिक्षिका सौ अर्चना कदम यांनी महिलांना योग मार्गदर्शन केले .तसेच covid-19 मध्ये आपल्या कुटूंबाची व स्वतः च्या जीवाची सुद्धा पर्वा न करता, स्वतः महिला अधिकारी असूनही रात्रंदिवस जबाबदारीची जाणीव ठेवून समाजाकरीता अविरतपणे आपले कर्तव्य बजावले . त्याबद्दल पंचायत समिती कारंजा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ .किरण जाधव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व उंबर्डाबाजार येथील परिचारिका सविता बुरडे यांचे सुद्धा covid-19 मधले कार्य हे उल्लेखनीय होते म्हणून महिला पतंजली परिवार कारंजा पतंजली मुख्य योग शिक्षिका सौ अर्चना कदम यांनी उपस्थित गावातील महिला यांच्यासमवेत त्यांचादेखील शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला व महिलांना डायबिटीज आणि थायरॉईड या आजारांवर आसन, प्राणायाम व ॲक्युप्रेशर सांगितले. यावेळी डॉ किरणताई जाधव व गावातील महिला शारदाताई बान्डे, दुर्गाताई घुडे ,सौ उज्वला सपकाळ ,धनश्री पंच गाडे ,सुलभा शिंदे ,अश्विनी गाढवे, संगीता इंगोले सविता बुर्डे प्रीती बुर्डे,ज्योती इंगोले ,नंदा पुनसे मोहिनी काठवडे ,वैशाली बोरकर, मोनिका ढोरे, वनमाला गिरी, अनुराधा ठाकूर लक्ष्मी ठाकूर ,वृंदा शिंदे कर्मचारी सतीश भाऊ उपस्थित होते . असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .




0 Response to "तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ . किरण जाधव यांचा,पतंजली योगशिक्षीका अर्चना कदम यांचेकडून भव्य सत्कार !"
Post a Comment