स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम: स्वच्छ कार्यालय पुरस्कार वितरण आणि स्वच्छतेचे नायक गौरव समारंभ संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य /
वाशिम :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम:
स्वच्छ कार्यालय पुरस्कार वितरण आणि
स्वच्छतेचे नायक गौरव समारंभ संपन्न
जि प च्या शिक्षण विभागाने पटकाविला प्रथम पुरस्कार
वाशिम दि.12
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये स्वच्छ कार्यालय ही पंचायत राज त्रिस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ग्राम पंचायत स्तरावर पहिला पुरस्कार मालेगाव तालुक्यातील बोरगाव या ग्राम पंचायतीने पटकाविला होता. रिसोड तालुक्यातील हराळ व वाशिम तालुक्यातील ब्रम्हा या ग्राम पंचायतींना व्दितिय पुरस्कार विभागुन देण्यात आला. मानोरा तालुक्यातील कारखेडा आणि कारंजा तालुक्यातील धामणी खडी या दोन ग्राम पंचायतींना सुध्दा तृतिय पुरस्कार विभागुन देण्यात आला. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ या ग्राम पंचायतीला प्रोत्साहनपर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पंचायत समिती स्तरावर मानोरा पंचायत समितीला प्रथम, मंगरुळपीर पंचायत समितीला दुसरा आणि वाशिम पंचायत समितीला तिसरा पुरस्कार देण्यात आला. गट विकास अधिकारी अनुक्रमे सुधाकर पंडे, हरिनारायण परिहार आणि प्रमोद बदरखे यांच्यासह पंचायत समितीच्या चमुला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद स्तरावरील विभागांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षण विभागाला प्रथम, अर्थ विभागाला व्दितीय आणि बांधकाम विभागाला तृतिय पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाला प्रोत्साहनपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गजानन खुळे, निलेश देवकते, दिनेश बोलके, विमल काळे, अस्मिता जाधव, लेखाधिकारी प्रशांत जोशी, सु. ब. जाधव, प्रविण पंधारे, बांधकाम विभागाचे दिपक देशमुख, हरिहर वाघ, भारत राजस, गजानन इंगोले, सामान्य प्रशसान विभागाचे प्रविण राऊत, सतिश लहामगे, देवानंद धंतुरे यांनी विभागाच्या वतीने पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी केले. संचालन प्रा. गजानन वाघ आणि आभार प्रदर्शन मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रशासन अधिकारी रविंद्र सोनोने, प्रफुल्ल काळे, सुमेर चाणेकर, अभिजित दुधाटे, पुष्पलता अफुने, विजय नागे, प्रदिप सावळकर, अनिल सुर्वे, अमित घुले, समाधान खरात यांनी परिश्रम घेतले.
---***---
राम श्रृंगारे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
0 Response to "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम: स्वच्छ कार्यालय पुरस्कार वितरण आणि स्वच्छतेचे नायक गौरव समारंभ संपन्न"
Post a Comment