-->

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत

 


साप्ताहिक सागर आदित्य 

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत

       वाशिम,  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्तवतीने जिल्हा न्यायालय येथे आणि तालुका विधी सेवा समिती व तालुका विधीज्ञ मंडळ यांच्या संयुक्तवतीने तालुका न्यायालय येथे 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 5.30 वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड न करण्याजोगे प्रकरणे वगळून), आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भुसंपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे (मनाई हुकूमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद) या प्रकरणांचा समावेश आहे.

तरी ज्या पक्षकारांची वर नमुद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी १३ ऑगष्ट रोजी आपली प्रकरणे आपसांत करण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्याशी संपर्क साधावा. राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद समोपचाराने कायमचे मिटवावेत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. कलोती व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्हि. ए. टेकवाणी यांनी केले आहे.

  






Related Posts

0 Response to "13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालत"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article